१२५ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार
By admin | Published: September 29, 2014 01:00 AM2014-09-29T01:00:22+5:302014-09-29T01:00:22+5:30
राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीने पोलिसांचीही चिंता वाढवली आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेता आणि गुन्हेगारांच्या युतीद्वारा (संबंध) गडबड पसरवण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी
निवडणुकीसाठी पोलीसही सज्ज : नेते-गुन्हेगारांच्या संबंधांवर करडी नजर
जगदीश जोशी - नागपूर
राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीने पोलिसांचीही चिंता वाढवली आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेता आणि गुन्हेगारांच्या युतीद्वारा (संबंध) गडबड पसरवण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी राजकारणाशी संबंधित लोकांसह १२५ गुन्हेगारांना पोलीस कोठडीत टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
नागपुरातील १२ विधानसभेच्या जागेसाठी सर्वच उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. या संधीचा लाभ घेऊन सर्वच मोठ्या गुन्हेगारांनी राजकीय पक्षांशी जवळीक साधली आहे. त्यामुळे पोलिसांनीही अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार पोलिसांनी नेत्यांशी संबंधित आणि निवडणुकीमध्ये सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. दारू आणि पैसे वाटणे, दंगा घडविणे, मतदारांना प्रभावित करणाऱ्या लोकांचा या यादीत समावेश आहे. सात गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्याची शहरा पोलिसांची योजना आहे. गेल्या आठवड्यात नंदनवन येथील जीतू जाधव याला तुरुंगात पाठवून याची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच २० गुन्हेगारांना तडीपार आणि १०० गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून तुरुंगात पाठविण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान आतापर्यंत ८५३ लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शेजारी राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.