डागा रुग्णालयातील १२५ परिचारिका संपावर; नोकरीत स्थायी करण्याची मागणी
By सुमेध वाघमार | Published: October 27, 2023 05:50 PM2023-10-27T17:50:17+5:302023-10-27T17:52:01+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसूनही शुक्रवारी तोडगा निघला नाही.
नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसूनही शुक्रवारी तोडगा निघला नाही. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील तब्बल १२५ तर ग्रामीण भागातीलही कंत्राटी परिचारिका संपावर गेल्याने व रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी- अधिकारी कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबरला सुरू झालेल्या संपात सामुदायीक आरोग्य अधिकाºयांनी उडी घेतली. पूर्व विदभार्तील ४,३३५ कर्मचारी संपात असल्याने येथील रुग्णसेवा सलाईनवर असल्याचे चित्र आहे. पूर्व विदभार्तील सहा जिल्ह्यांत आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी असे एकूण ५ हजार ३८६ कंत्राटी अधिकारी- कमचार्री कार्यरत आहे. त्यापैकी ४ हजार ३३५ अधिकारी- कर्मचारी गुरूवारी संपात होते. शुक्रवारी यात पुन्हा संपकर्त्यांची भर पडली. सध्या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी- कर्मचारी संपावर असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे.