नागपुरात निवृत्त सिव्हिल सर्जनला १२.७८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 09:51 PM2018-03-09T21:51:44+5:302018-03-09T21:51:57+5:30

१ कोटी, ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करून नायजेरियन टोळीने येथील एका सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाला (सीएस) १२ लाख, ७८ हजारांचा गंडा घातला.

12.78 lakh cheated to retired civil surgeon in Nagpur | नागपुरात निवृत्त सिव्हिल सर्जनला १२.७८ लाखांचा गंडा

नागपुरात निवृत्त सिव्हिल सर्जनला १२.७८ लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे१.८० कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी : चार वर्षांपासून बनवाबनवी : नायजेरियन टोळीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १ कोटी, ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करून नायजेरियन टोळीने येथील एका सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सकाला (सीएस) १२ लाख, ७८ हजारांचा गंडा घातला. तब्बल साडेतीन वर्षांपासून लॉटरीची रक्कम मिळणार म्हणून आरोपीने सांगितलेल्या खात्यात सीएस रक्कम जमा करीत होते. प्रत्येक वेळी वेगळे कारण सांगून रक्कम हडपणाऱ्या  आरोपींची बनवाबनवी तब्बल चार वर्षांनंतर त्यांच्या ध्यानात आली आणि त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दशरथ डोमाजी कांबळे (वय ७७) असे या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. ते अजनीतील कुकडे लेआऊटमध्ये राहतात.
अजनी पोलसांच्या माहितीनुसार, कांबळे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात सेवारत होते. १७ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. एप्रिल २०१४ मध्ये कांबळे यांच्या मोबाईलवर ९२३४५ १६२४७९० च्या मोबाईलधारक आरोपीचा फोन आला. उपरोक्त मोबाईल नंबरवरून बोलणाºया आरोपीने कांबळेंचे अभिनंदन करून त्यांना १ कोटी ८० लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी केली. कुठलीही लॉटरी काढली नसतानादेखील एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याचे ऐकून कांबळेंचा आनंद गगनात मावेनासा झाला. लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी मनी ट्रान्सफर चार्ज तसेच वेगवेगळ्या नावाखाली कांबळे यांच्याकडून नमूद मोबाईलधारक आरोपीने रक्कम उकळणे सुरू केले. सर्वात पहिल्यांदा आरोपीने सांगितल्याप्रमाणे कांबळे यांनी १६ एप्रिल २०१४ ला २७ हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर आरोपीच्या साथीदाराने सांगितल्यानुसार कधी ३० तर कधी ५० हजार रुपये कांबळे जमा करू लागले. ही रक्कम भरा, नंतर तुमच्या लॉटरीची रक्कम काढून घ्या, असे म्हणणाºया आरोपीने २० जानेवारी २०१८ ला त्यांना पुन्हा ८० हजार रुपये जमा करायला लावले. कांबळेंने तेदेखील त्यांच्या खात्यात जमा केले. अशा प्रकारे १६ एप्रिल २०१४ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत कांबळेंनी आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख, ७८, ३५० रुपये जमा केले. प्रत्येक वेळी त्यांना लॉटरीची रक्कम आता मिळेल, अशी आशा होती. तर, त्यांच्या लालसेचा गैरफायदा घेत आरोपी कांबळेंना रक्कम जमा करायला लावत होते.
आप्तांनाही नव्हती खबरबात
२० जानेवारीला ८० हजार रुपये जमा केल्यानंतर पुन्हा आरोपींनी त्यांना ८० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे कांबळे अस्वस्थ झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांना तीन मुले आहेत. त्यातील एक नागपूर, दुसरा बेंगळुरू आणि तिसरा विदेशात राहतो. चार वर्षात एवढी मोठी रक्कम जमा करणाऱ्या  कांबळेंनी आतापावेतो ही माहिती त्यांच्या कुणाच आप्तस्वकीयांना दिलेली नव्हती. नातेवाईकांना ते सरप्राईस देण्याच्या मन:स्थितीत होते. मात्र, प्रत्येकवेळी आरोपी मोठी रक्कम भरायला सांगत असल्याने त्यांना शंका आली. त्यांनी आपल्या स्वकीयांसोबत चर्चा केली. लॉटरीचे आमिष दाखवून अशा प्रकारे अनेक जणांना गंडविल्याची माहिती अनेकांनी कांबळेंना सांगितली. त्यामुळे त्यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून गुरुवारी रात्री आरोपींविरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ३४ तसेच आयटी अ‍ॅक्टचे सहकलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला.

 

 

Web Title: 12.78 lakh cheated to retired civil surgeon in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.