विदर्भात १२९३ पॉझिटिव्ह, ३७ रुग्णांचा मृत्यू; रुग्णसंख्या ३४, १९४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:32 PM2020-08-19T21:32:35+5:302020-08-19T21:33:40+5:30
नागपूर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येची मोठी वाढ झाली. रुग्णांची संख्या १६,७३३ वर गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी नागपूर सोडल्यास इतर जिल्ह्यात बुधवारी रुग्णसंख्येत घट दिसून आली. आज १२९३ रुग्णांची नोंद झाली तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील १०९६ रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४१९४ तर मृतांची संख्या ९९४ वर पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येची मोठी वाढ झाली. रुग्णांची संख्या १६७३३ वर गेली. शिवाय, ३० रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ५७९ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ४० रुग्णांचे निदान झाले. रुग्णसंख्या ४१३९ झाली. गोंदिया जिल्ह्यात ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ८८४ वर पोहचली. यवतमाळ जिल्ह्यात २५ रुग्णांची नोंद तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या २३६७ तर मृतांची संख्या ६५ झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या २३९५ झाली. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ४१ मृतांची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ३० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या ११९५ वर गेली आहे. अकोला जिल्ह्यात १८ रुग्ण तर चार रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३३३१ झाली असून मृतांची संख्या १४१ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात चार रुग्णांची नोंद झाली.