नागपुरात १३ विमाने पोहोचली, उर्वरित रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:42 PM2020-03-24T23:42:33+5:302020-03-24T23:43:56+5:30
देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. विमाने मंगळवारी रात्री ८.३० पर्यंतच आली. अखेरचे इंडिगोचे ६ई ४३६ इंदूर-नागपूर विमान रात्री ८.३० वाजता आले.
मंगळवारी नागपूर पोहोचणाऱ्या अन्य विमानांमध्ये जी८-२८४ पुणे-नागपूर, ६ई ४३७ बेंगळुरू-नागपूर, ६ई ७१३६ हैदराबाद-नागपूर, ६ई ५०९ इंदूर-नागपूर, जी८- २६०१ अहमदाबाद-नागपूर, ६ई ५३२५ मुंबई-नागपूर, जी८- ७३१ अहमदाबाद-नागपूर, ६ई ५६३ चेन्नई-नागपूर, ६ई १३५ दिल्ली-नागपूर, ६ई १३४ पुणे-नागपूर, ६ई ४०३ कोलकाता-नागपूर आणि ६ई २०२ दिल्ली-नागपूर आदींचा समावेश आहे. या उड्डाणांव्यतिरिक्त उर्वरित उड्डाणे रद्द झाली. मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर सर्व विमाने रद्द राहण्याच्या सूचनेनंतर, प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय विमानतळावरून माहिती घेत आहेत. अनेक प्रवाशांना तिकिटांचे अतिरिक्त शुल्क घेऊन तारखेत बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.