मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:10 PM2020-08-27T22:10:52+5:302020-08-27T22:12:47+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आतापर्यंत १३२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात अभियांत्रिकी विभागातील सर्वच गँगमनना कामावर बोलविण्यात येत आहे. याशिवाय टीआरडी विभाग, सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॅरेज अॅण्ड वॅगन या विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. कोरोनामुळे विद्युत लोको शेडमधील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १११ कर्मचारी बरे झाले असून १० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर ११ कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची मागणी कर्मचारी संघटना करीत आहेत.
कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहोत
रेल्वे कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन तासांनी फवारणी करण्यात येते. सर्वच विभागात कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग