१३२ औद्योगिक संस्थांना मिळणार नवी ओळख ; नामकरणास मान्यता देण्याचा निर्णय जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:18 IST2025-01-18T11:18:06+5:302025-01-18T11:18:39+5:30

Nagpur : राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत

132 industrial institutions will get new identity; Decision to approve naming announced | १३२ औद्योगिक संस्थांना मिळणार नवी ओळख ; नामकरणास मान्यता देण्याचा निर्णय जाहीर

132 industrial institutions will get new identity; Decision to approve naming announced

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसोबतच त्या संस्थेच्या नावातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी विविध महनीय व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आता महनीय व्यक्तींची नावे देण्यात आली असून, तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.


ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे व खासगी औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.


प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.


नागपूरच्या संस्थांची नावे 
हिंगणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता श्री संत गमाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमेश्वर नागपूर येथील स्व. आप्पा साहेब हळदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही येथील श्री संत रुख्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड येथील श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर येथील स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड येथील स्व. भैयाजी दाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, काटोल येथील महर्षी पतंजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी नावे देण्यात आली आहे.

Web Title: 132 industrial institutions will get new identity; Decision to approve naming announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर