कोविड हेल्थ सेंटरसाठी ऑक्सिजनसह १३२० बेडची सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:04 AM2020-04-25T00:04:18+5:302020-04-25T00:05:54+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या रुग्णालयात सरासरी १ हजार ३२० बेड असलेले ‘कोविड हेल्थ सेंटर’ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

1320 beds with oxygen available for Covid Health Center | कोविड हेल्थ सेंटरसाठी ऑक्सिजनसह १३२० बेडची सुविधा उपलब्ध

कोविड हेल्थ सेंटरसाठी ऑक्सिजनसह १३२० बेडची सुविधा उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे : हिंगणा परिसरातील रुग्णालयाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या रुग्णालयात सरासरी १ हजार ३२० बेड असलेले ‘कोविड हेल्थ सेंटर’ सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केंद्रीय राखीव दलाचे रुग्णालय, लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे मेडिकल रुग्णालयाची पाहणी केली. कोविड हेल्थ सेंटरसाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ६०० बेड , शालिनीताई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे ६०० बेड, तसेच सीआरपीएफ येथे १२० बेड उपलब्ध आहेत. तसेच ५० ते ६० व्हेंटिलेटरची सुविधासुद्धा उपलब्ध होऊ शकते. रुग्णालय सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Web Title: 1320 beds with oxygen available for Covid Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.