नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:09 PM2019-09-24T23:09:26+5:302019-09-24T23:10:50+5:30

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

13430 beneficiaries of personal toilet in Nagpur city | नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

Next
ठळक मुद्देमनपाचा स्वच्छता अभियानात पुढाकार : गरीब कुटुंबांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती मोहीम राबवून गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तसेच शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.
तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याने महापालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
राज्य सरकारने नागपूर शहराला यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त झाले होते. यातील १३,४३० पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे.
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलेली आहे. पाच शौचालयाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वर्दळीच्या जागी ही शौचालये उभारली जात आहे. याते नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.
कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण होते. यामुळे कचऱ्याला आग लागते व धूर पसरून प्रदूषण वाढते. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची लगेच विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

कचरा वर्गीकरण करूनच संकलित करा
शहरातील नागरिकांना कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी कचरा वर्गीकरण आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन करणाऱ्याकडे द्यावा, असे आवाहन राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे व स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.
स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन
शहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपकडे तक्रार केली तर १२ तासात तक्रारीचे निराकरण होईल. नागरिकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहन राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर संस्थांनी व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करता येतात.

 

Web Title: 13430 beneficiaries of personal toilet in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.