उज्जैनला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १३.४४ लाखांवर डल्ला

By दयानंद पाईकराव | Published: November 19, 2023 06:54 PM2023-11-19T18:54:42+5:302023-11-19T18:54:51+5:30

एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

13.44 lakhs stolen from the house of the person who went to Ujjain | उज्जैनला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १३.४४ लाखांवर डल्ला

उज्जैनला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १३.४४ लाखांवर डल्ला

नागपूर: कुटुंबासह उज्जैनला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागीने व रोख असा एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर अज्ञात आरोपीने डल्ला मारला.

ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी १४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० ते शुक्रवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. विकास उर्फ बंटी दिलीप वर्मा (वय ४४, रा. बांते ले आऊट, सोनेगाव) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह उज्जैनला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने, डीव्हीआर व रोख ११ लाख ३९ हजार ५०० रुपये असा एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: 13.44 lakhs stolen from the house of the person who went to Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.