१३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 08:49 PM2019-03-09T20:49:26+5:302019-03-09T22:52:01+5:30

जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधानीतील काही तरुणांनी राबविला. चक्क १३५ किमीच्या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ (तीन दिवस) मध्ये सहभागी होऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देत विंग कमांडर अभिनंदन यांना सलामी दिली.

135 km of 'triple marathon': tribute to martyrs' by youth | १३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली

१३५ किमीची ‘ट्रिपल मॅरेथॉन’ : शहिदांना तरुणाईची आगळीवेगळी श्रद्धांजली

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर ते देवरीपर्यंत तीन दिवसांत ‘रण’

गणेश खवसे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधानीतील काही तरुणांनी राबविला. चक्क १३५ किमीच्या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ (तीन दिवस) मध्ये सहभागी होऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देत विंग कमांडर अभिनंदन यांना सलामी दिली.
नागपूर ते देवरी असे १३५ किमीची ट्रिपल मॅरेथॉनला शनिवारी (दि. ९) हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ‘टीम अपार’ने हा उपक्रम राबविला असून पारडी (नागपूर) येथील भवानी माता मंदिरापासून ही चमू देवरीच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या दिवशी ‘टीम अपार’मधील सहभागी पाच सदस्य भंडाऱ्यापर्यंत पोहोचले. रविवारी भंडारा ते साकोलीपर्यंतचा टप्पा गाठला जाणार असून सोमवारी साकोली ते देवरीपर्यंतचे अंतर कापले जाणार आहे.
पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी असा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचे धाडस केल्याचे ‘टीम अपार’चे मंथन पटले याने सांगितले. सोबतच विंग कमांडर यांच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठीही हा उपक्रम घेण्यात असल्याचे त्याने सांगितले. या उपक्रमात मंथन पटले याच्यासोबतच अपूर्व नायक, शत्रुघ्न पटले, रिना ठोसर सहभागी झालेले आहेत. या ‘ट्रिपल मॅरेथॉन’ दरम्यान मार्गातील प्रत्येक पोलीस पोलीस स्टेशनला चमू भेट देत आहे. नागपूर येथे या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविली त्यावेळी निशिकांत काशीकर, वैभव अंधारे, पंकज दहीकर, देवेंद्र वैद्य, चेतन नासरे, कुलदीप परीमल, सिंधू सोनी, सुरेश लांगे आदी उपस्थित होते. कॅन्डल मार्च, मौन वा इतर प्रकारांपेक्षा सैनिकांना त्यांच्याच ‘स्टाईल’मध्ये श्रद्धांजली देण्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे ‘टीम अपार’च्या सदस्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उपक्रमांसोबतच जनजागृती
‘टीम अपार’ने आतापर्यंत अनेक आगळेवगळे उपक्रम राबवित जनजागृती केली आहे. तीन वर्षांपूर्वी याच चमूने नागपूर ते रायपूर महामार्गालगत ५०० वृक्ष लागवड केली. नागपूर ते नाशिक सायकल रॅली काढून साक्षरता जनजागृती केली. या दोन्ही उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. नागपूर ते काठमांडू (नेपाळ) पर्यंत आणि त्यानंतर देशभरात १० हजार किमीचा प्रवास केवळ १५ दिवसांत बाईक रॅलीने करीत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’बाबत जनजागृती केली. त्याची नोंद ‘एशिया बुक रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. यानंतर नागपूर ते नेपाळपर्यंत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’साठीच सायकल रॅली काढण्यात आली. यासोबतच प्रदूषणाविरोधातही या चमूने जनजागृती केली. नागपूर ते हुगळीपर्यंतचा मोटरसायकलने प्रवास करीत हेल्मेट आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृतीची मोहीम या चमूने राबविली.

Web Title: 135 km of 'triple marathon': tribute to martyrs' by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.