मास्क न वापरणाऱ्या १३९ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:24+5:302020-12-30T04:10:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ...

139 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या १३९ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या १३९ नागरिकांना दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १३९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ६९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २५ हजार ६४० नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ११ लाख ७९ हजाराचा दंड वसूल केला आहे.

रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १८, धरमपेठ २४, हनुमाननगर १८, धंतोली ७, नेहरूनगर १०, गांधीबाग १०, सतरंजीपुरा ११, लकडगंज ११, आशीनगर १७, मंगळवारी झोनअंतर्गत १० आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत २० हजार १७० नागरिकांकडून १ कोटी ८५ हजार वसूल करण्यात आले आहे.

Web Title: 139 citizens fined for not wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.