शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार
By नरेश डोंगरे | Published: June 30, 2024 10:05 PM2024-06-30T22:05:29+5:302024-06-30T22:05:56+5:30
शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार
नागपूर : दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या खरगपूर रेल्वे विभागात, २९ जूनपासून सुरू झालेल्या ब्लॉकच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यातील १४ गाड्या पुन्हा आधीच्याच वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. यात भुसावळ - अकोला - नागपूर मार्ग धावणाऱ्या १२ रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.
यापूर्वी रद्द केलेल्या मात्र आता पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांमध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे. १८०२९ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ४ ते ६ जुलै पर्यंत, १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, ६ ते ८ जुलै पर्यंत, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ४ ते ६ जुलै, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, ६ ते ८ जुलै, १२९०५ पोरबंदर-शालीमार एक्स्प्रेस, ४ जुलै २०२४, १२९०६ शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस ६ जुलै, १२९४९ पोरबंदर-संत्रागाछी एक्स्प्रेस, ५ जुलै २०२४, १२९५० संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस ७ जुलै, २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस, ६ जुलै, २२५१११ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस ९ जुलै, १२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ६ जुलै आणि १२१०२ शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ८ जुलै पर्यंत.
उशीरा सुटणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस पुणे स्थानकावरून ३० जून २०२४ला ३० मिनिटे विलंबाने, १ जुलैला ९० मिनिटे विलंबाने आणि ४ जुलैला ३ तास विलंबाने सुटेल.
गाडी क्रमांक २२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस ओखा येथून ३० जून २०२४ रोजी १ तास विलंबाने सुटेल. गाडी क्रमांक १२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस, मुंबई एलटीटी येथून १ जुलैला १ तास ३० मिनिटे, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस हावडा येथून १ जुलैला १ तास १५ मिनिटे विलंबाने, १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल - हावडा मेल, मुंबईतून ४ जुलैला ३ तास विलंबाने, १२१५१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ४ जुलैला १ तास ४५ मिनिटे विलंबाने, १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस हावडा येथून ६ जुलैला १ तास ४५ मिनिटे विलंबाने आणि गाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर-शालीमार एक्स्प्रेस पोरबंदर येथून ४ जुलैला ३ तास विलंबाने सुटेल.