१४ आस्थापनांना सव्वा लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:34+5:302021-02-27T04:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ‘एनडीएस’तर्फे (न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड) कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी ...

14 establishments fined Rs | १४ आस्थापनांना सव्वा लाखाचा दंड

१४ आस्थापनांना सव्वा लाखाचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ‘एनडीएस’तर्फे (न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड) कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी ११ दुकाने, संस्था, लॉन व रेस्टॉरेन्ट्सविरोधात कारवाई करून १ लाख २३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

मंगल कार्यालये ७ मार्चपर्यंत बंद करण्यात आली असल्याने त्यांची तपासणी बंद झाली आहे. नेहरूनगर झोनअंतर्गत रजिस्ट्री कार्यालयावरदेखील ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ज्या लोकांनी मंगल कार्यालये, सभागृह, लॉनमध्ये लग्न समारंभासाठी बुकिंग केली आहे, त्यांची रक्कम परत करण्यात यावी. जे पैसे परत करणार नाहीत, त्यांच्यावर मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

यांच्यावर झाली कारवाई

झोन - दुकान / आस्थापना - दंड (रुपयांमध्ये)

लक्ष्मीनगर झोन - श्रीनाथ फरसाण (त्रिमूर्तीनगर) - १० हजार

लक्ष्मीनगर झोन - रामजी पोहेवाले (वर्धा मार्ग) - ५ हजार

धरमपेठ झोन - लेडीज क्लब - १० हजार

धरमपेठ झोन - मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर - ८ हजार

धंतोली झोन - प्रणय वाईन शॉप (सुयोगनगर) - ५ हजार

नेहरुनगर झोन - रजिस्ट्री कार्यालय (सूर्यनगर) - ५ हजार

नेहरुनगर झोन - देशी वाईन शॉप (संघर्षनगर) - ५ हजार

लकडगंज झोन - रिवाज लॉन (कळमना मार्ग) - २० हजार

आसीनगर झोन - विवान पार्क (वैशाली नगर) - १० हजार

मंगळवारी झोन - तमन्ना वाईन शॉप (जरीपटका) - ५ हजार

मंगळवारी झोन - पांडे लॉन (जाफरनगर) - ५ हजार

मंगळवारी झोन - नवनाथ रेस्टॉरेन्ट (गोधनी मार्ग) - ५ हजार

मंगळवारी झोन - शंकर किराणा स्टोअर (भूपेंद्र नगर) - ५ हजार

मंगळवारी झोन - पाटणकर क्लासेस (मोहननगर) - ५ हजार

Web Title: 14 establishments fined Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.