जुगार खेळणारे १४ जणांना अटक, १.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By दयानंद पाईकराव | Published: September 13, 2024 03:44 PM2024-09-13T15:44:36+5:302024-09-13T15:45:30+5:30

Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी

14 gamblers arrested, valuables worth 1.68 lakh seized | जुगार खेळणारे १४ जणांना अटक, १.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

14 gamblers arrested, valuables worth 1.68 lakh seized

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जुगार खेळत असलेल्या १४ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुर्गानगर भरतवाडा येथे केली.

रमेश जयराम वरखेडे (३५), रोहण अमरनाथ शाहु (४०), राजेश आसाराम बोडीले (४५), नितीन छबीलाल देवगडे (२६), सनी नरेन्द्र चंदे (३०), सुनिल नागोजी सोनटक्के (३४), समीर नागोराव सोनटक्के (२८) सर्व रा. दुर्गानगर, भरतवाडा, सचिन बळीराम सिंगाडे (४६, रा. ओमनगर, कळमणा), दिपक बनवादास खिडनारे (३४), विष्णू बनवादास खिडनारे (४७), मंगेश गौतम ढोले (३४) सर्व रा. रानवकन्या नगर, कळमणा, पुरण तोरणसिंग नैताम (३६, रा. भवानी नगर, पारडी), अक्षय कैलास चकोले (२८, रा. भरतवाडा, पारडी) आणि दिनेश विनोद दिग्रसे (२८, रा. भोलेश्वरनगर कळमना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. त्यांना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुर्गानगर भरतवाडा येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी जुगार खेळताना रंगेहात सापडले. आरोपींच्या ताब्यातून रोख २१ हजार ७४० रुपये, दोन दुचाकी, ५ मोबाईल, ताशपत्ते व इतर साहित्य असा एकुण १ लाख ६८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कळमना पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सामाजीक सुरक्षा विभागाच्या निरीक्षक कविता इसारकर आणि त्यांच्या पथकाने केली.

Web Title: 14 gamblers arrested, valuables worth 1.68 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.