Corona Virus in Nagpur; नागपुरात एकाच दिवशी १४ पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ४१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 08:04 PM2020-04-12T20:04:41+5:302020-04-12T20:05:16+5:30
एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जबलपूर येथील चार, सतरंजीपुऱ्यातील चार, वेलकम कॉलनी काटोल रोड येथील चार, मोमीनपुºयातील व कामठी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यात मरकजहून आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वाेतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु काही नागरिक जाणीपूर्वक माहिती लपवून किंवा चुकीची माहिती देऊन यात अडथळे आणत आहे. काही लोकांपर्यंतच असलेला कोरोना विषाणू आता इतरांच्याही दारात पोहचला आहे. आतातरी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. -पॉझिटिव्ह नमुन्यामध्ये मेयोच्या प्रयोगशाळेतील सहा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत शनिवारी १२१ नमुने तपासण्यात आले. यातील सात रुग्णांचे नमुने शनिवारी मध्यरात्री तपासले असता यातील सहा नमुने पॉझिटिव्ह आले. यात दोन सतरंजीपुºयातील रहिवासी आहेत. उर्वरीत चार पॉझिटिव्ह नमुन्याचे रुग्ण जबलपूर येथील आहेत. हे मरकजहून नागपुरात आल्याचे सांगण्यात येते. या सहाही पुरुष रुग्णांना ३१ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील पहिल्या दोन रुग्णांना मेयोमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. -मेडिकलच्या प्रयोगशाळेत आठ पॉझिटिव्ह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत शनिवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधून नऊ नमुन्यांची मध्यरात्री पुन्हा तपासणी करण्यात आली. सकाळी आलेल्या अहवालात आठ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात चार पुरुष व चार महिला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सतरंजीपुºयातील दोन पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक मरकजहून आला होता. तर दुसरा रुग्ण घरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. वेलकम कॉलनी काटोल रोड येथील चार तर कामठी येथील एक या पॉझिटिव्ह रुग्णांची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. मोमीनपुºयातील आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. यातील चार लोणारा येथे क्वारंटाइन होते तर उर्वरित चार हे मेडिकलमध्ये भरती होते.
१६५ नमुने निगेटिव्ह मेयोच्या प्रयोगशाळेत
आज रविवारी कोरोना संशयितांचे ४२ व न्यूमोनिया रुग्णाचे ३७असे एकूण ७९ नमुने तपासले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ४५ तर मेडिकलने ४१ नमुने तपासले असता सर्वच म्हणजे, १६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेला हे काहिसा दिलासा देणारे आहे.