रेल्वेस्थानकावर दारूच्या १४० बॉटल जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:24+5:302020-12-04T04:21:24+5:30
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर इटारसी एन्डकडील भागात एका बेवारस बॅगमधून ११,९०० ...
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर इटारसी एन्डकडील भागात एका बेवारस बॅगमधून ११,९०० रुपये किमतीच्या दारूच्या १४० बॉटल्स जप्त केल्या असून, जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या ॲन्टी हॉकर्स ॲन्ड क्राईम डिटेक्शन टीमचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, उषा तिग्गा, अश्विनी मुळतकर, श्याम झाडोकार, जितेंद्र कुमार, नागपूर ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप सिंह, जगत सिंह, बी. बी. यादव, राज्य उत्पादन शुल्क विभाग अ-१ चे उपनिरीक्षक विनोद भोयर, चंदू गोबाडे सकाळी ७.५५ वाजता रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर इटारसी एन्डकडील भागात एक बेवारस बॅग दिसली. बॅगबाबत आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅग आरपीएफ ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात मध्य प्रदेशात तयार झालेल्या दारूच्या १४० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
..............