पीककर्जाच्या नावावर बँकांना १.४० काेटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:26+5:302021-09-21T04:09:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शेतीची खाेटी कागदपत्रे तयार करून बनावट शेतकऱ्यांच्या नावे रामटेक तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या दाेन ...

1.40 crore bribe to banks in the name of crop loan | पीककर्जाच्या नावावर बँकांना १.४० काेटीचा गंडा

पीककर्जाच्या नावावर बँकांना १.४० काेटीचा गंडा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शेतीची खाेटी कागदपत्रे तयार करून बनावट शेतकऱ्यांच्या नावे रामटेक तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या दाेन शाखांना १ काेटी ४० लाख ४० हजार रुपये पीककर्जाची उचल करीत बँकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आराेपीची एकूण संख्या १४७ असून, यातील दाेघांना अटक करण्यात आली. बाेगस पीककर्ज प्रकरणांची संख्या १४३ असल्याने या प्रकरणात सर्वांना आराेपी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पाेलीस निरीक्षक विवेक साेनवणे यांनी दिली.

संजय रामदास देशमुख (५०, रा. शीतलवाडी, ता. रामटेक) व मोहनलाल हरिश्चंद्र भलावी (४५, रा. बेलदा, ता. रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या दाेघांनीही बनावट शेतकऱ्यांच्या नावे शेतीची खाेटी कागदपत्रे तयार केली आणि बँक अधिकारी व बँक मित्र यांना हाताशी धरून पीककर्जाची १४३ प्रकरणे मंजूर करुन घेतली. या दाेघांनीही बँक ऑफ इंडियाच्या शीतलवाडी शाखेतून त्यांनी पीककर्जापाेटी १ काेटी ४० लाख ४० हजार रुपयांची उचल केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात २ मार्च २०१९ राेजी पाेलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकटे यांनी पाेलीस अधीक्षक यांच्या परवानगीने या प्रकरणात १३ जून २०१९ राेजी भादंवि ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. हे कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेकडे सादर करण्यात आलेले सातबारा, गाव नमुना आठ अ, निवडणूक आयाेगाचे ओळखपत्र, आधार कार्ड यासह अन्य कागदपत्रे बाेगस असल्याचे तसेच ज्यांच्या नावे पीकर्जाची उचल केली ते रामटेक व पारशिवनी तालुक्यातील रहिवासी असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले आहे. बँक व पाेलीस अधिकाऱ्यांनी या सर्व कागदपत्रांची संबंधित कार्यालयाकडे पडताळणी केली आहे. या प्रकरणाचा निरपेक्ष तपास केल्यास बँक अधिकारी, कर्मचारी व बँक मित्र जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

...

पाच वर्षांनंतर पाेलिसात तक्रार

या दाेघांनीही सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात बँक ऑफ इंडियाच्या शीतलवाडी शाखेत बाेगस पीककर्जाची एकूण १४३ प्रकरणे सादर केली हाेती. यात दाेघांनीही तत्कालीन शाखा व्यवस्थापक गोपाल हरीश चौधरी यांची दिशाभूल करीत ही सर्व प्रकरणे मंजूर करुन घेत कर्जाच्या रकमेची उचल केली. ऑडिटदरम्यान हा प्रकार बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला असावा. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी २ मार्च २०१९ राेजी रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी शुक्रवारी (दि. १७) दाेघांना अटक केली. न्यायालयाने त्या दाेघांनाही मंगळवार (दि. २१)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.

...

प्रकरणांची संख्या १४३ तर आराेपी १४७

याच काळात पाेलिसांना बँक ऑफ इंडियाच्या इतवारी, नागपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक अधिकारी मेहता यांचा चाैकशी अहवाल प्राप्त झाला. या अहवालात बाेगस पीककर्ज प्रकरणांची संख्या १४३ असल्याचे तसेच या प्रकरणात आराेपींची संख्या १४७ असल्याचे निष्पन्न झाले. ज्यांच्या नावे पीककर्जाची उचल करण्यात आली, त्यांनाही आराेपी करण्यात आले आहे.

...

मनसर बँकेत १७.८० लाखांचा घाेळ

आराेपींनी बँक ऑफ इंडियाच्या मनसर (रामटेक) शाखेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक पल्लवी सचिन बाेबडे यांच्या कार्यकाळात ऑक्टाेबर २०१४ मध्ये शेतीची खाेटी कागदपत्रे सादर करून १७ लाख ८० हजार रुपयांच्या पीककर्जाची उचल केली हाेती. या प्रकरणात रामटेक पाेलिसांनी भादंवि ४२०, ४६७, ४६८,४७१, ४७२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. आराेपींनी मजुरांना शेतकरी दाखवून कर्जाची उचल केली. या प्रकरणात विशाल सीताराम हिवसे, रा. परसाेडा, ता. रामटेक यास गुरुवारी (दि. १६) अटक केली आहे.

Web Title: 1.40 crore bribe to banks in the name of crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.