कोविड नियंत्रणासाठी १५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:08 AM2021-03-18T04:08:04+5:302021-03-18T04:08:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणाचा मनपाला आर्थिक फटका बसला आहे. संक्रमणाचा धोका अजूनही कायम आहे. याचा विचार ...

15 crore for covid control | कोविड नियंत्रणासाठी १५ कोटी

कोविड नियंत्रणासाठी १५ कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमणाचा मनपाला आर्थिक फटका बसला आहे. संक्रमणाचा धोका अजूनही कायम आहे. याचा विचार करता कोविड नियंत्रणासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद केली आहे. गरज पडल्यास यात आणखी वाढ करण्यात येईल. आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तीन कोटीची तरतूद करण्यात आली होती, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी दिली.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मिनीमातानगर व नारा नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महापालिका स्वयंसेवा संस्थांच्या सहकार्याने शहराच्या विविध भागात ७५ वंदेमातरम्‌ नागरी आरोग्य सुविधा केंद्र सुरू करणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

...

अर्थसंकल्पातील ठळक बाबी

- २४ बाय ७७ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ७८ कोटी

- अमृत योजनेंतर्गत कामासाठी ७२.५० कोटी

- सिमेंट रस्त्यासाठी १०० कोटी

- महाल व सक्करदरा बुधवार बाजार व्यावसायिक संकुलाचे बांधकाम

- गांधीसागर तलावाचे मजबुतीकरण व सुशोभिकरण

- मेट्रो मॉल

- जिजाऊ स्मृती शोध संस्थान ७.४२ कोटी

- सार्वजनिक विद्युत व्यवस्था ६० कोटी

- इंग्रजी माध्यमांच्या शाळांकरिता ५ कोटी

- थीम बेस उद्यान, फुलपाखरू उद्यान व रोज गार्डन निर्मिती

- जुन्या अग्निशमन केंद्राचे पुनर्बांधकाम ५ कोटी

- फायर टेंडर व इमर्जन्सी टेंडर खरेदीसाठी १७.९० कोटी

- नाग नदी प्रदूषण प्रतिबंध १५ कोटी

- भिक्षेकरूंच्या पुनर्वसनाकरिता डिजिटल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू

....

Web Title: 15 crore for covid control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.