राज्यात १५ सायबर लॅब

By admin | Published: August 9, 2016 02:46 AM2016-08-09T02:46:26+5:302016-08-09T02:46:26+5:30

कॉम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या (आॅनलाईन) गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त

15 Cyber ​​Labs in the State | राज्यात १५ सायबर लॅब

राज्यात १५ सायबर लॅब

Next

आॅनलाईन गुन्ह्यांचा तातडीने छडा : स्वातंत्र्य दिनी उद्घाटन
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
कॉम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या (आॅनलाईन) गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे. यापैकी नागपूरसह ठिकठिकाणच्या १५ सायबर लॅबचे काम अंतिम टप्प्यात असून, स्वातंत्र्य दिनी, १५ आॅगस्टला त्या कार्यान्वित होणार आहेत. या लॅबमुळे तपासाचे धागेदोरे जोडण्यासाठी पोलिसांना ‘फॉरेन्सिक लॅब’ वर महिनोंमहिने अवलंबून राहावे लागणार नाही.
अलीकडे आॅनलाईन गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढतो आहे. विशेषत: मोठमोठे घोटाळे करणारी मंडळी संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये इकडे तिकडे करताना पकडले जाऊ नये यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधतात. आर्थिक घोटाळ्यांसोबतच डब्बा ट्रेडिंगसारखी कोट्यवधींची सट्टेबाजी, क्रिकेट बेटींग, लॉटरी लागल्याच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक, दिशाभूल करणारी माहिती देऊन परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेण्याचे गैरप्रकार बिनबोभाट सुरू आहेत.

उपकरणे आणि प्रशिक्षणही !
४केवळ प्रशस्त कक्षच नव्हे तर अत्याधुनिक उपकरणेही ‘सायबर लॅब’मध्ये जोडण्यात आली असून, मोबाईल फॉरेन्सिक सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर, हार्डडिस्क फॉरेन्सिक सॉफ्टवेअर डिवाईसचा त्यात समावेश राहणार आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी या प्रणालीचा उपयोग कसा करावा, त्याचे सिडॅकमार्फत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सध्या चंद्रपुरात हे प्रशिक्षण दिले जात असून, त्यानंतर नागपुरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडॅकतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे आता सायबर लॅबमध्येच संगणक, मोबाईलमध्ये दडवून ठेवलेल्या साहित्याची बसून कॉपी, ईमेजेस बनविणे शक्य होईल. पासवर्डही क्रॅक करता (शोधता) येईल.

Web Title: 15 Cyber ​​Labs in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.