१५ प्रतिष्ठानांना १.३२ लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:10+5:302021-04-28T04:09:10+5:30
लक्ष्मीनगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ ...
लक्ष्मीनगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, हनुमाननगरमध्ये एका प्रतिष्ठानाची तपासणी केली. धंतोली झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार रुपये दंड केला. नेहरूनगरच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, गांधीबाग झोनमध्ये चार ठिकाणी तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार, आसीनगरमध्ये नऊ प्रतिष्ठानांची तपासणी करून ३२ हजार, लकडगंज झोनमध्ये १३ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार तर मंगळवारी झोनमध्ये ४ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.