१५ प्रतिष्ठानांना ८५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:28+5:302021-04-01T04:08:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी बुधवारी ४६ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १५ जणांकडून ...

15 establishments fined Rs 85,000 | १५ प्रतिष्ठानांना ८५ हजाराचा दंड

१५ प्रतिष्ठानांना ८५ हजाराचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी बुधवारी ४६ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १५ जणांकडून ८५ हजाराचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धरमपेठ झोनअंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये नऊ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करूत २० हजार, गांधीबाग झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने १० प्रतिष्ठानांची तर मंगळवारी झोनच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार तर मंगळवारी झोनमध्ये पाच हजार दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 15 establishments fined Rs 85,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.