राजनांदगावकडे धावणाऱ्या ईतवारी-रिवासह १५ रेल्वे रद्द; 'या' ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 11:23 AM2022-11-05T11:23:54+5:302022-11-05T11:27:42+5:30

नॉन इंटरलॉकिंगचे काम, सहा गाड्या अर्ध्यातच थांबणार

15 trains including Itwari-Rewa Express running towards Rajnandgaon cancelled; Routes of 9 trains changed | राजनांदगावकडे धावणाऱ्या ईतवारी-रिवासह १५ रेल्वे रद्द; 'या' ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

राजनांदगावकडे धावणाऱ्या ईतवारी-रिवासह १५ रेल्वे रद्द; 'या' ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

googlenewsNext

नागपूर : राजनांदगाव - कळमना रेल्वे मार्गावरील सालवा रेल्वेस्थानकाला तिसरी लाईन संलग्न करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील ईतवारी रिवा एक्स्प्रेससह १५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कामामुळे ६ रेल्वेगाड्या अर्ध्यावरच थांबणार आहेत, तर ९ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये कोरबा-इतवारी एक्स्प्रेस, इतवारी-कोरबा एक्स्प्रेस, बिलासपूर -इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस, इतवारी- बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, रीवा-इतवारी एक्स्प्रेस, इतवारी-रीवा एक्स्प्रेस, गोंदिया-इतवारी मेमू, इतवारी-गोंदिया मेमू, रायपूर -इतवारी स्पेशल पॅसेंजर, इतवारी- रायपूर स्पेशल पॅसेंजर, तिरोडी-इतवारी पॅसेंजर, इतवारी-तिरोडी पॅसेंजर, दुर्ग- गोंदिया मेमू स्पेशल, गोंदिया-दुर्ग मेमू स्पेशल आणि बिलासपूर - कोरबा पॅसेंजरचा समावेश आहे.

६ ते ८ नोव्हेंबरला धावणारी मुंबई - गोंदिया एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई)- गोंदिया एक्स्प्रेस नागपूरपर्यंतच धावेल. गोंदिया मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई)- गोंदिया एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईसाठी पुढे निघेल. ६ ते ८ नोव्हेंबरला धावणारी टाटानगर - इतवारी एक्स्प्रेस आणि ७ ते ९ नोव्हेंबरला इतवारी टाटानगर एक्स्प्रेस गोंदिया येथून रवाना होईल.

दुसऱ्या मार्गाने धावणाऱ्या गाड्या

बिलासपूर - भगत की कोठी एक्स्प्रेस, बिकानेर - बिलासपूर एक्स्प्रेस, कोरबा अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस, अमृतसर कोरबा छत्तीसगड एक्स्प्रेस, हावडा मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई हावडा दुरंतो एक्स्प्रेस, पुणे हावडा दुरंतो एक्स्प्रेस, कुर्ला शालिमार एक्स्प्रेस आणि शालिमार कुर्ला एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे मार्ग ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीसाठी बदलविण्यात आले आहे.

Web Title: 15 trains including Itwari-Rewa Express running towards Rajnandgaon cancelled; Routes of 9 trains changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.