नागपुरात नाल्याची १५० मीटर भिंत पडली, घरांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:10 AM2020-06-16T00:10:33+5:302020-06-16T00:12:44+5:30
रविवारच्या पावसात बाजेरिया मारवाडी चाळ नाल्याची सुमारे १५० मीटर लांबीची भिंत कोसळली. यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे, तसेच आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजूला असलेला हायटेंशन लाईनचा पोल कोसळण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारच्या पावसात बाजेरिया मारवाडी चाळ नाल्याची सुमारे १५० मीटर लांबीची भिंत कोसळली. यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे, तसेच आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजूला असलेला हायटेंशन लाईनचा पोल कोसळण्याची शक्यता आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याचे कार्यादेश देण्यात यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली.
या कामाची निविदा काढण्यात आली असून कार्यादेशासाठी ही फाईल जानेवारी महिन्यापासून आयुक्त यांच्या कार्यालयात पडून आहे, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: जागेची पाहणी केल्यानंतर या कामाची उपयुक्तता विचारात घेता यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सोमवारी तिवारी यांनी पुन्हा आयुक्तांना निवेदन देऊन कार्यादेश देण्याचे आवाहन केले.