राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १५०० वातानुकूलित बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:41 PM2017-12-12T18:41:10+5:302017-12-12T18:41:44+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास १५३ शिवशाही वातानुकूलित बसेस प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच १५०० बसेस भाडेतत्त्वावर प्राप्त होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

1500 air-conditioned buses will soon be commissioned by the state transport corporation | राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १५०० वातानुकूलित बसेस

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १५०० वातानुकूलित बसेस

Next
ठळक मुद्देपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती


आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास १५३ शिवशाही वातानुकूलित बसेस प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच १५०० बसेस भाडेतत्त्वावर प्राप्त होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. अनंत गाडगीळ यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
पहिल्या टप्प्यात ७०० बसेसचा पुरवठा करण्यासाठी सात निविदाकारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाने स्वमालकीच्या ५०० बसेस घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने शिवशाही बसेस दाखल होत असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली.
राज्य परिवहन महामंडळाने दोन हजार वातानुकूलित बसेस सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कार्यवाही केली, असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला होता.

Web Title: 1500 air-conditioned buses will soon be commissioned by the state transport corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.