३५०० मान्यवरांच्या साक्षीने १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा
By admin | Published: September 14, 2015 03:12 AM2015-09-14T03:12:53+5:302015-09-14T03:12:53+5:30
महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव ग्रंथाचे प्रकाशन : तुळशीचे रोप देऊ न स्वागत
नागपूर : महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे. मनपाच्या १५१ व्या स्थापना वर्षानिमित्त आयोजित समारंभात ३५०० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर सात मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मनपाच्या १५१ वर्षांच्या इतिहासावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा होईल. दटके यांनी रविवारी मानकापूर क्रीडा संकुलातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे व्यासपीठापासून ४५ मीटर जागा मोकळी सोडण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे स्वागत कुंडीत लावलेल्या तुळशीने केले जाणार आहे, तसेच स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचा सत्कार करण्यात येईल. व्यासपीठावर राष्ट्रपती यांच्या डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर तर उजव्या बाजूला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गौरव गं्रथात प्रामुख्याने अविस्मरणीय चित्रावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी शहरातील आमदार, खासदार, अधिकारी, पदाधिकारी, न्यायाधीश, विविध संस्थांचे प्रमुख आदींना निमंत्रित करण्यात आले आहे; तसेच स्वातंत्र्य सैनिक, अर्जुन पुरस्कारप्राप्त मान्यवरांनाही निमंत्रित केले आहे. (प्रतिनिधी)