१५४ नागरिकांना मास्क देऊन आकारला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:31+5:302020-12-09T04:07:31+5:30

मनपाची आतापर्यंत २३,०५४ व्यक्तींविरुद्ध कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय ...

154 citizens were fined for wearing masks | १५४ नागरिकांना मास्क देऊन आकारला दंड

१५४ नागरिकांना मास्क देऊन आकारला दंड

Next

मनपाची आतापर्यंत २३,०५४ व्यक्तींविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ७७ हजाराचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २३,०५४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ९८ लाख ८६ हजाराचा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप धोका टळला नाही. असे असूनही अनेक जण विनामास्क फिरतात. ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

मंगळवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २२, धरमपेठ २०, हनुमाननगर ३१, धंतोली ८, नेहरूनगर १४, गांधीबाग ८, सतरंजीपुरा ९, लकडगंज ८, आशीनगर ११ आणि मंगळवारी २० तर मनपा मुख्यालयात ३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात आहे. नागरिकांनी मास्क लावून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: 154 citizens were fined for wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.