रोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 09:36 AM2021-04-22T09:36:40+5:302021-04-22T09:37:02+5:30
Nagpur news; उपराजधानीत रुग्णांना ऑक्सिजनची कमी जाणवत असल्याने बाहेरील राज्यांतून साठा बोलविण्यात येत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत रुग्णांना ऑक्सिजनची कमी जाणवत असल्याने बाहेरील राज्यांतून साठा बोलविण्यात येत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे दररोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार असून त्याचा फायदा विदर्भातील रुग्णांना होणार आहे.
विशाखापट्टणम येथील आरआयएनएल प्लॅन्टमधून राज्याला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. भिलाई येथील स्टील प्लॅन्टमधून दररोज ६० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रुग्णालयांनीदेखील प्रयत्न केले पाहिजेत. ५० हून अधिक खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांत हवेपासून ऑक्सिजन बनविणारा प्लॅन्ट उभारायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.