फूड प्रोडक्ट कंपनीच्या फ्रँचाईसीसाठी १५.७१ लाखांनी फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 07:16 PM2023-02-10T19:16:48+5:302023-02-10T19:17:19+5:30

Nagpur News फूड प्रोडक्ट कंपनीची फ्रँचाईसी देण्याच्या नावावर ऑनलाईन १५.७१ लाख भरण्यास सांगून फ्रँचाईसी न देता फसवणूक केल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे.

15.71 lakhs cheated for the franchise of a food product company | फूड प्रोडक्ट कंपनीच्या फ्रँचाईसीसाठी १५.७१ लाखांनी फसविले

फूड प्रोडक्ट कंपनीच्या फ्रँचाईसीसाठी १५.७१ लाखांनी फसविले

Next

नागपूर : फूड प्रोडक्ट कंपनीची फ्रँचाईसी देण्याच्या नावावर ऑनलाईन १५.७१ लाख भरण्यास सांगून फ्रँचाईसी न देता फसवणूक केल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे.

राहुल दिलीप मुपीडवार (३५, शिवमंदिर, ग्रामपंचायतजवळ, येरखेडा) यांनी खाजगी व्यवसाय करण्यासाठी गुगलवर सर्च केले असता आरोपी मोबाईल क्रमांक ८९८१३११५५१ चा धारक उमेन्द्रकुमार लहरे याने आपण फूड प्रोडक्ट कंपनीचे काम करीत असल्याची बतावणी केली. कंपनीची फ्रँचाईसी मिळविण्यासाठी त्याने राहुल यांना १५ हजार ५०० रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून १५ लाख ७१ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावले. पैसे भरल्यानंतरही आरोपीने फ्रँचाईसी न देता राहुल यांची फसवणूक केली. राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (ड), माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

...........

Web Title: 15.71 lakhs cheated for the franchise of a food product company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.