१५८ सागवान झाडांची विक्री, नातेवाईकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:39+5:302021-01-15T04:08:39+5:30
सावनेर : वडिलाेपार्जित जमिनीतील १५८ सागवान झाडांची परस्पर विक्री करून आराेपीने नातेवाईकांची चार लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना ...
सावनेर : वडिलाेपार्जित जमिनीतील १५८ सागवान झाडांची परस्पर विक्री करून आराेपीने नातेवाईकांची चार लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खानगाव शिवारात नुकतीच उघडकीस आली.
सुदर्शन बापूराव गुंजारकर (५४, रा. नागलवाडी, ता. हिंगणा) असे आराेपीचे आहे. फिर्यादी अरविंद बापूराव गुंजारकर (५०, रा. नागलवाडी) व इतर नातेवाईकांच्या खाेट्या स्वाक्षरी करून आराेपीने नाेटरी तयार केली. तसेच आराेपीने दाेन मृत नातेवाईक हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामअधिकारी धापेवाडा यांच्याकडून प्राप्त करून त्याआधारे वडिलाेपार्जित जमिनीतील २५ ते ३० वर्षांपूर्वीची जुनी १५८ सागवान झाडांची विक्री करून नातेवाईकांची चार लाख रुपयांनी फसवणूक केली. शिवाय आराेपीने खाेटे दस्तऐवज तयार केले.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास सावनेर पाेलीस करीत आहेत.