मास्क न वापरणाऱ्या १५९ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:59+5:302021-02-12T04:08:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द ...

159 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या १५९ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या १५९ नागरिकांना दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द कारवाई केली. ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३१३६१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ४० लाख ३९ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३०, धरमपेठ २८, हनुमाननगर २५, धंतोली ३, नेहरुनगर ९, गांधीबाग ७, सतरंजीपूरा ४, लकडगंज १०, आशीनगर २०, मंगळवारी १९ आणि मनपा मुख्यालयातील ४ जणांविरुध्द ही कारवाई केली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत २५८९१ बेजबाबदार नागरिकांकडून १ कोटी २९ लाख ४५ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Web Title: 159 citizens fined for not wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.