नागपुरात १५९ अनधिकृत झोपडपट्ट्या()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:15+5:302020-12-14T04:25:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाखांहून अधिक असून ४४७ झोपडपट्ट्या आहेत. यात २८७ अधिकृत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाखांहून अधिक असून ४४७ झोपडपट्ट्या आहेत. यात २८७ अधिकृत तर १५९ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. स्लम भागात ८५८९८३ नागरिक वास्तव्यास आहेत.
रोजगाराच्या शोधात आलेल्या परप्रांतीय व अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी निवारा म्हणून शासकीय व निमशासकीय जागांवर झोपड्या उभारल्या. शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे त्या नियमित करण्यात आल्या.
रोजगाराच्या शोधात परप्रांतातून व जिल्ह्यातून आलेल्या लोकांनी निवारा म्हणून शासकीय व खासगी मालकीच्या मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारल्या कालांतराने याला कायद्याने संरक्षण मिळत गेले. अनधिकृत झोपडपट्ट्या नियमित करण्यात आल्या. झोपडपट्ट्यांना राजकीय नेत्यांकडूनही वेळोवेळी संरक्षण मिळत गेले. यातून शहरात झोपडपट्ट्या उभ्या राहण्याला मदत झाली.
....
नगरसेवकांच्या माध्यमातून वीज-पाणी
अनधिकृत झोपडपटट्यात नियमानुसार वीज व पाणी कनेक्शन मिळत नाही. परंतु वॉर्डाचे नगरसेवक, राजकीय नेत्यांच्या माध्यमातून वीज व पाणी पुरवठा उपलब्ध झाला. कालांतराने रस्ते गडर लाईन अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.
...
रोजगाराच्या शोधात नागपुरात आलो. तुटपुंज्या कमाईतून भाड्याच्या घरात राहणे शक्य नाही. नवीन घर बांधणे आवाक्याबाहेर असल्याने निवारा म्हणून शासकीय जागेवर झोपडे उभारले. निवाऱ्याची सुविधा झाली.
-वसंतराव नाईक झोपडपट्टीधारक
....
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. अशा परिस्थितीत भाड्याने राहणे शक्य नाही. नवीन घर तर आमच्यासाठी स्वप्नच आहे. अशा परिस्थितीत झाेपडीत राहण्याशिवाय पर्याय नाही.
-राजनगर झोपडपट्टीधारक
........
नागपूर शहराची लोकसंख्या -२४५५६६५
शहरातील झोपडपट्ट्या -४४६
अधिकृत झोपडपट्ट्या -२८७
अनधिकृत झोपडपट्ट्या -१५९
झोपडपट्टीधारक -८५८९८३
स्लम भागातील घरे -१७१६४५
......
४४७ झोपडपट्ट्या आहेत. यात २८७ अधिकृत तर १५९ अनधिकृत आहेत. शासन निर्णयानुसार वेळोवेळी नियमित करण्यात आल्या. २०१९ नंतर नवीन झोपड्या वसणार नाही, असा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे
मिलिंद मेश्राम, उपायुक्त मनपा