१६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा आज लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:28 AM2017-11-15T00:28:45+5:302017-11-15T00:29:15+5:30

महापालिकेच्या हनुमाननगर झोनतर्फे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते.

16 auction of assets of debtors today | १६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा आज लिलाव

१६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा आज लिलाव

Next
ठळक मुद्देहनुमाननगर झोनची कारवाई : मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या हनुमाननगर झोनतर्फे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. परंतु याला प्रतिसाद न मिळाल्याने, १६ मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा बुधवारी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी जाहीर लिलाव केला जाणार आहे. लिलाव करण्यात येणाºया मालमत्तात नरेंद्रनगर येथील न्यू लोककल्याण क ो-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी येथील पाच प्लॉटचा समावेश आहे. यात शुभकरण पूनमचंद दंगड यांचा प्लॉट क्रमांक ७, राजमणी वसंतराव मोड यांचा प्लॉट क्रमांक २१, वसंतराव सूरजप्रसाद मोड यांचा प्लॉट क्रमांक २२, मीराबाई दुर्गाजी मसारकर यांचा प्लॉट क्रमांक ६५ व निर्मला पुंडलिकराव मानकर यांचा प्लॉट क्रमांक ८२ आदींचा समावेश आहे.
युनिक क ो-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लि. खरी येथील अर्चना गणेश हजारे यांचा प्लॉट क्रमांक ७, सोसायटीचा प्लॉट क्रमांक ८, रविशंकर चिरकूटदास कुरोज यांचा प्लॉट क्रमांक २१ व २२ तसेच सोसायटीचा प्लॉट क्रमांक २४, सीमा राजकुमार शाहू यांचा प्लॉट क्रमांक २५, राजकुमार विद्याधर शाहू यांचा प्लॉट क्रमांक २६, सोसायटीचा प्लॉट क्रमांक ४१ व ४४ आणि ५०, नरेंद्रनगर येथील नगरविकास सोसायटीमधील लिलिता दिलीप पाटणे यांचा प्लॉट क्रमांक १०२ आदींचा प्लॉटच्या ठिकाणी लिलाव केला जाणार असल्याची माहिती हनुमाननगर झानेचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी दिली. लिलावात करण्यात येणाºया मालमत्ताधारकांनी गेल्या २००८ सालापासून मालमत्ता कर भरलेला नाही. फेबु्रवारी २०१६ मध्ये ३१ थकबाकीदारांना वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली. यात १६
थकबाकीदारांनी थकबाकी भरली; परंतु १६ जणांनी थकबाकी भरली नाही. त्यानंतर हुकूमनामे काढण्यात आले. लिलाव करण्यात येणाºया मालमत्ताधारकांचा सिटी सर्वे कार्यालयाच्या रेकॉर्डवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या विभागाकडे २००८ सालापूर्वीच्या नोंदी असल्याच्या आढळून आल्या. नोंदी असलेल्या नावाने नोटीस, हुकूमनामे बजावण्यात आले, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title: 16 auction of assets of debtors today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.