नागपुरात १६ संशयित दाखल : अमेरिका प्रवासावरून आलेल्या एका कुटुंबाचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:59 PM2020-03-17T22:59:51+5:302020-03-17T23:01:02+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात प्रशासनाला यश येत असल्याचे चित्र आहे. सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तर मंगळवारी फक्त १६ रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये दाखल झाले.

16 suspects admitted in Nagpur: including a family from US travel | नागपुरात १६ संशयित दाखल : अमेरिका प्रवासावरून आलेल्या एका कुटुंबाचाही समावेश

नागपुरात १६ संशयित दाखल : अमेरिका प्रवासावरून आलेल्या एका कुटुंबाचाही समावेश

Next
ठळक मुद्देकोरोना संशयित रुग्णांच्या संख्येतही घट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात प्रशासनाला यश येत असल्याचे चित्र आहे. सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तर मंगळवारी फक्त १६ रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये दाखल झाले. पुढील १४ दिवस लोकांनी घरीच राहिल्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या कोरोनावर विजय मिळविणे शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. त्यानंतर १३ मार्च रोजी या रुग्णाच्या पत्नीची नोंद झाली. याच दिवशी अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक तर १४ मार्च रोजी त्याच्या संपर्कात आलेला आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. यातील एका रुग्णावर मेयोमध्ये तर तीन रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झाल्याने संशयित रुग्णांची संख्याही कमी होताना दिसून येत आहे. मेडिकलमध्ये दिवसभरात आठ संशयित रुग्ण दाखल झाले. यात दोन पुरुष, चार महिला व दोन लहान मुले आहेत. विशेष म्हणजे, अमेरिका प्रवासाचा पूर्वेतिहास असलेल्या एकाच घरातील तिघे आहेत. यात एक वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे. याशिवाय फ्रान्समधून प्रवास करून आलेली २३ वर्षीय महिला आहे. या सर्वांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता आहे. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मंगळवारी आठ संशयित रुग्ण भरती झाले. यातील सहा संशयितांचा परदेशी प्रवासाचा तर दोघांचा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्काचा इतिहास आहे.

दुपारपर्यंत सहा नमुने निगेटिव्ह
मेयोच्या प्रयोगशाळेत आज पहिल्या टप्प्यात मेयोतील पाच तर अकोल्यातून आलेल्या एक असे सहा संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. दुपारनंतर मेयोतील दोन तर मेडिकलमधील आठ संशयित रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीला सुरुवात झाली. त्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत संशयितांची संख्या १३१
आतापर्यंत नागपुरात १३१ कोरोना विषाणू संशयितांची नोंद झाली असून यातील ९६ रुग्णांना भरती करण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या चार रुग्ण वगळता इतर सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. या सर्व रुग्णांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.

विमानतळावर २२ प्रवाशांची तपासणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा आणि शारजा येथून येणाºया १००४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात मंगळवारी तपासण्यात आलेल्या २२ प्रवाशांचा समावेश आहे. यातील सात प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जाणार आहे.

Web Title: 16 suspects admitted in Nagpur: including a family from US travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.