उभ्या ट्रकमधील साेयाबीन तेलाचे १६० डबे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:11+5:302021-06-16T04:12:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : चालकाने खाद्यतेलाची वाहतूक करणारा ट्रक पेट्राेल पंप परिसरात उभा केला आणि केबिनमध्ये झाेपी गेला. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : चालकाने खाद्यतेलाची वाहतूक करणारा ट्रक पेट्राेल पंप परिसरात उभा केला आणि केबिनमध्ये झाेपी गेला. त्यातच चाेरट्याने त्या ट्रकमधील साेयाबीन खाद्यतेलाचे १६० डबे चाेरून नेले. त्या खाद्यतेलाची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार रुपये आहे. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव (ता. नागपूर) ग्रामीण येथे नुकतीच घडली.
राजेंद्र रामभगतसिंह चव्हाण (४४, रा. नेताजीनगर, नागपूर) हे ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक आहेत. त्यांच्या एमएच-४०/जीआर-२७७४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये साेयाबील खाद्यातेलाचे १,७०० डबे सावनेर तालुक्यातून भिवंडी (मुंबई) येथे नेले जात हाेते. हा ट्रक ९ जूनला रात्री भिवंडीच्या दिशेने रवाना झाला. ट्रकचालक अशोक जितूलाल नागोत्रा (२५, रा. शेंडेनगर, कामठी) हा ट्रकमध्ये एकटाच असल्याने त्याने मध्यरात्री हा ट्रक बाजारगाव येथील पेट्राेल पंप परिसरात उभा केला आणि केबिनमध्ये झाेपी गेला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकळी त्याला ट्रकवरील ताडपत्री कापली असल्याचे आढळून आले. त्याने आतील डबे माेजले असता १६० डबे चाेरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्या सांगण्यावरून राजेंद्र चव्हाण यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या तेलाची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार रुपये असल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी ट्रकचालक अशाेक नागाेत्रा याच्या विराेधात भादंवि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...
सीसीटीव्ही फुटेजची मदत
या घटनेच्या तपासासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आल्याची माहिती ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी दिली. चाेरट्याने जाे भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येत नाही, त्याच भागातील ट्रकवरील ताडपत्री कापली. तिथे छाेटे मालवाहू वाहन उभे करून ट्रकमधील खाद्यतेलाचे डबे काढून चाेरून नेले, असेही विश्वास पुल्लरवार यांनी सांगितले.