१६५ पाणीपुरवठा योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:23+5:302021-09-19T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील १६५ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. नळ शो-पीससारखे ठरले असून नागरिक भर पावसाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील १६५ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. नळ शो-पीससारखे ठरले असून नागरिक भर पावसाच्या दिवसात पाण्यासाठी भटकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. विजेची थकबाकी असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची वीज कापल्याने ही पाळी आली आहे.
नागपूर जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची संख्या २,९११ आहे. २,१३६ योजनांवर ४५ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यात ४.५ कोटी रुपयांचे बिल चालू महिन्यातील आहे. २०२०-२१ मधील थकबाकी ८.५ कोटी आणि त्यापूर्वीचे ३३ कोटी रुपये थकीत आहेत. महावितरणने ग्रामविकास आणि नगरविकास मंत्रालयाच्या सूचनेवरून संबंधित जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका, नगर पंचायतींना थकबाकीची नोटीस दिली. मात्र थकबाकी भरली गेली नाही. यामुळे आता कनेक्शन कापणे सुरू केले आहे. तर दुसरीकडे आर्थिक स्थितीमुळे बिल भरण्यास ग्रामपंचायती असमर्थ आहेत.
...
उमरेड सर्वाधिक प्रभावित
डिव्हिजन : पाणीपुवठा योजना : कापलेले कनेक्शन
उमरेड : ४५९ : ७०
सावनेर : ४८७ : २१
मौदा : ५१४ : ६५
काटोल : ४९८ : ३
(उर्वरित कापलेले ४४ कनेक्शन महावितरणच्या शहर परिमंडळाचे आहेत)
...
रस्तेही अंधारात
८२ ठिकाणी रस्तेही अंधारात आहेत. कारण थकबाकी न भरल्याने स्ट्रीट लाइटचे कनेक्शन कापण्यात आले आहे. जिल्ह्यात स्ट्रीट लाइटचे एकूण ५ ३५४ कनेक्शन आहेत. यापैकी २,९७१ कडे १०२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. आता महावितरणने हे कनेक्शन कापायला सुरुवात केली आहे.
...