मास्क न वापरणाऱ्या १६६ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:53+5:302021-02-18T04:13:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली ...

166 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या १६६ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या १६६ नागरिकांना दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून, त्यांच्याकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यांत शोध पथकांनी ३२२७७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ४४ लाख ९७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

बुधवारी पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १३, धरमपेठ ३२, हनुमाननगर २०, धंतोली ५, नेहरूनगर १७, गांधीबाग ७, सतरंजीपुरा १३, लकडगंज १४, आशीनगर ८, मंगळवारी ३२ आणि मनपा मुख्यालयातील पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपयांप्रमाणे आतापर्यंत २६८०७ नागरिकांकडून १ कोटी ३४ लक्ष ३ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Web Title: 166 citizens fined for not wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.