पाचव्या दिवशी १७ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:06+5:302021-07-04T04:07:06+5:30

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी पाचव्या दिवशी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी कुही ...

17 applications filed on the fifth day | पाचव्या दिवशी १७ अर्ज दाखल

पाचव्या दिवशी १७ अर्ज दाखल

googlenewsNext

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी पाचव्या दिवशी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी कुही तालुक्यातील राजोला सर्कलसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला होत्या. आतापर्यंत एकूण १८ अर्ज दाखल झाले असून, यात जि.प.साठी ८ व पंचायत समितीसाठी १० उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

कामठी तालुक्यात गुमथाळा जि.प. सर्कलमधून आंबेडकर राईट ऑफ इंडिया पार्टीच्या वतीने अ‍ॅड. विष्णू पांडुरंग पानतावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर हिंगणा तालुक्यातील डिगडोह देवी जि.प. सर्कलमधून भाजपाकडून सुचिता विनोद ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर डिगडोह इसासनी सर्कलमधून भाजपच्या अर्चना कैलास गिरी यांनी अर्ज दाखल केला. निलडोह सर्कलमधून राजेंद्र विठ्ठल हरडे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर पंचायत समितीसाठी सुरेश काळबांडे, लीलाधर पटले, बबिता धीरज आंबेटकर, अनुपमा बबलू वैद्य यांनी अर्ज दाखल केला. नागपूर ग्रामीणमध्ये पंचायत समितीसाठी ममता अजय जैस्वाल यांनी अर्ज दाखल केला.

मौदा तालुक्यात जिल्हा परिषद सर्कल अरोलीसाठी भाजपचे सदानंद निमकर यांनी अर्ज दाखल केला. तर पंचायत समितीसाठी शानू विलास वैद्य, रामेश्वर बापुराव लिचडे, पायल अमोल पिकलमुंडे यांनी अर्ज दाखल केला. तर नरखेड तालुक्यातील भिष्णूर सर्कलसाठी अपक्ष उमेदवार शेख शब्बीर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Web Title: 17 applications filed on the fifth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.