१७ दिवसांत स्वाईन फ्लूचे १७ बळी

By Admin | Published: October 18, 2015 03:26 AM2015-10-18T03:26:48+5:302015-10-18T03:26:48+5:30

शहरात सर्वत्र उत्सवाची धामधूम सुरू असताना, स्वाईन फ्लूच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

17 days of swine flu in 17 days | १७ दिवसांत स्वाईन फ्लूचे १७ बळी

१७ दिवसांत स्वाईन फ्लूचे १७ बळी

googlenewsNext

नागपूर : शहरात सर्वत्र उत्सवाची धामधूम सुरू असताना, स्वाईन फ्लूच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या १७ दिवसांमध्ये नागपूर विभागात १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर या महिन्यात ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत मृत्यूची संख्या १५२ झाली असून ७०८ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४ वर गेली होती. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही.
परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३ मध्ये २८, २०१४ मध्ये १० होती. परंतु या वर्षी ही संख्या इतर वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात गुरुवारी ५५ वर्षीय महिलेचा, बुधवारी नागपूर ग्रामीण येथील ४७ वर्षीय पुरुषाचा, भंडारा येथील ३५ वर्षीय महिलेचा तर मंगळवारी मध्यप्रदेशातील एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 17 days of swine flu in 17 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.