नागपुरात एकाच शाळेतील १७ मुलांना विषबाधा; अनोळखी व्यक्तीने दिले होते चॉकलेट

By योगेश पांडे | Published: December 3, 2022 04:09 PM2022-12-03T16:09:06+5:302022-12-03T16:12:08+5:30

सर्व मुलांची प्रकृती स्थिर

17 students of a school hit by food poisoning from chocolate in Nagpur | नागपुरात एकाच शाळेतील १७ मुलांना विषबाधा; अनोळखी व्यक्तीने दिले होते चॉकलेट

नागपुरात एकाच शाळेतील १७ मुलांना विषबाधा; अनोळखी व्यक्तीने दिले होते चॉकलेट

Next

नागपूरअनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने सिताबर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाली. या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. आता सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.

या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी चॉकलेट वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.

या सर्व मुलांना सिताबर्डी येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

Web Title: 17 students of a school hit by food poisoning from chocolate in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.