२६ प्रतिष्ठानांना १.७० लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:12+5:302021-05-26T04:09:12+5:30

मनपाची कारवाई : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी मंगळवारी २६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ...

1.70 lakh fine to 26 establishments | २६ प्रतिष्ठानांना १.७० लाखाचा दंड

२६ प्रतिष्ठानांना १.७० लाखाचा दंड

Next

मनपाची कारवाई :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी मंगळवारी २६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला. पथकाने ५३ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजाराचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ३८ हजार, धंतोलीच्या पथकाने १२ दुकानांची तपासणी करून १५ हजाराचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये, गांधीबाग येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २२ हजार रुपये, आसीनगर पथकाने ११ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजाराचा, तर मंगळवारी झोन पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ४० हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 1.70 lakh fine to 26 establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.