जिल्ह्यात १७०२ गावे कोरोनामुक्त, प्रतिबंधात्मक नियमांना मात्र रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:10 AM2021-08-15T04:10:19+5:302021-08-15T04:10:19+5:30

नागपूर आऊटरमध्ये धोका जास्त : मास्क झाला गायब उमरेड/काटोल : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ...

1702 villages in the district are corona free, but the restrictive rules are good! | जिल्ह्यात १७०२ गावे कोरोनामुक्त, प्रतिबंधात्मक नियमांना मात्र रामराम!

जिल्ह्यात १७०२ गावे कोरोनामुक्त, प्रतिबंधात्मक नियमांना मात्र रामराम!

Next

नागपूर आऊटरमध्ये धोका जास्त : मास्क झाला गायब

उमरेड/काटोल : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटरवर आली! ऑक्सिजनअभावी अनेकांचे जीव गेले. आता रुग्णसंख्या कमी होत असताना प्रतिबंधात्मक नियमांना मात्र सर्वांनीच ‘रामराम’ केल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी (दि.१३) रोजीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात तीन नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यातील १३ तालुक्यात १७०७ पैकी १७०२ गावे कोरोनामुक्त आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४६,१२१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यातील १,४३,५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, २,६०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूचे प्रमाण नाहीच्या बरोबर असले तरी रोज एक ना दोन रुग्णांची मात्र भर पडत आहे. सध्या ग्रामीण भागातील १४ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण असलेल्या सावनेर, काटोल, नरखेड, कामठी, उमरेड तालुक्यात सध्या एकही रुग्ण नाही. बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने तालुकास्तरावरील कोविड सेंटरही बंद करण्यात आले आहेत.

तज्ज्ञांच्या मतानुसार, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत, गावाच्या पारावर नागरिकांच्या तोंडावरील मास्क गायब झाला आहे. त्यामुळे तिसरी लाट आल्यास, याला जबाबदार कोण, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहिमही थंडावली आहे.

सावधान, या गावात पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात ११२ पैकी १११ गावे कोरोनामुक्त आहेत. गोंडेगाव येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे. मौदा तालुक्यात कुंभारी तर नागपूर ग्रामीण तालुक्यात वाडी, जामठी, खापरी येथे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूर शहरात रोज तीन ते चार रुग्णांची भर पडत असल्याने याचा फटका शहरालगतच्या न.प. क्षेत्रात आणि मोठ्या सोसायट्यांनाही बसतो आहे.

---

जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे

तालुका गावे

नरखेड १२३

काटोल १५८

कळमेश्वर १०८

सावनेर १२८

पारशिवनी १११

रामटेक १५४

मौदा ११९

कामठी ७७

नागपूर ग्रा. १३१

हिंगणा ११२

उमरेड १९२

कुही १५२

भिवापूर १३७

---

दररोज हजारावर चाचण्या

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ९,१०,२९५ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. दि. १३ रोजी ग्रामीण भागात ९२५ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. तीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात ६०३ आरटी-पीसीआर तर ३२२ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे.

Web Title: 1702 villages in the district are corona free, but the restrictive rules are good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.