कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:08 AM2020-05-09T01:08:58+5:302020-05-09T01:15:55+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत.

1,732 cleaners in Nagpur district to avoid corona | कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

googlenewsNext
ठळक मुद्देदिले ऑनलाईन प्रशिक्षण : ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार मार्गदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहींना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणाची परिस्थिती निर्माण करणे, कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी जाणीव-जागृती करण्यास मदत मिळेल.

ग्रामपंचायतीमधील स्वच्छाग्रहींना ऑनलाईनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावस्तरावर अपेक्षित असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील १,७३२ स्वच्छाग्रहींनी प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदवून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत कोविड-१९ आणि स्वच्छतेच्या संदर्भाने प्रबोधन करणार आहे. जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायतींमध्ये पाणी व स्वच्छताविषयक काम करण्यासाठी १९७५ स्वच्छाग्रही कार्यरत आहते. या प्रशिक्षणात कोरोना आजाराची संकल्पना, हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट, घ्यावयाची काळजी, रोग प्रसाराचे मार्ग, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, गावस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी, वयोवृद्ध व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फु साचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, गर्भवती महिला, लहान मुले, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये पाणी, साबण, स्वच्छता, शौचालयाचा वापर, मैला गाळ व्यवस्थापन, सर्वांसाठी सामाजिक अंतर, कोविड- संभाव्यबाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, घरातील उपचार, आजाराचे समज-गैरसमज, मानहानी व भेदभाव याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: 1,732 cleaners in Nagpur district to avoid corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.