१.७४ कोटींच्या फसवणुकीचा तपास संथगतीने

By admin | Published: June 9, 2017 02:37 AM2017-06-09T02:37:24+5:302017-06-09T02:37:24+5:30

हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील १ कोटी ७४ लाखांच्या बनावट वाहन कर्जप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहा महिन्याचा काळ उलटला.

1.74 crore fraud investigations | १.७४ कोटींच्या फसवणुकीचा तपास संथगतीने

१.७४ कोटींच्या फसवणुकीचा तपास संथगतीने

Next

बनावट वाहन कर्ज प्रकरण े रॅकेटमधील १७ पैकी दोघांनाच अटक े सूत्रधाराचा जामीन फेटाळला
राहुल अवसरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगर शाखेच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील १ कोटी ७४ लाखांच्या बनावट वाहन कर्जप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहा महिन्याचा काळ उलटला. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास कासवगतीने सुरू आहे. १७ जणांचे रॅकेट या गुन्ह्यात सहभागी असताना आतापर्यंत केवळ दोघांनाच अटक करण्यात आलेली आहे. या बनावटगिरीचा मुख्य सूत्रधार दर्शन कॉलनी येथील रहिवासी भूषण नंदकिशोर चरडे याचा गुरुवारी नियमित जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावताच पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले.
बनावट वाहन कर्ज प्रकरण २४ सप्टेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१६ या काळात घडले. बँकेचे शाखा व्यवस्थापक देवराव उरकुडा मोहंदेकर यांच्या तक्रारीवरून २८ जानेवारी २०१७ रोजी भादंविच्या ४०६,४६५, ४६७, ४६८,४७१,४७२, ४७३,४७४,४२०,३४,१२०(ब) कलमान्वये १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी मोहम्मद जावेद शेख मोहम्मद अब्दुल शेख (३३) रा. चिखली कळमना आणि भूषण चरडे हे दोघे २८ जानेवारीपासून अटकेत आहेत. शेख इस्माईल शेख गुलाब, राज श्यामलाल आडे, मोहम्मद अब्दुल रशीद शेख, राजेश प्रभाकरन नायर, गोपाल रामप्रसाद अग्रवाल, अनिस खाँ मेहबूबखाँ पठाण, ताहीर शेख छोटेसाहेब रसूल शेख, रवींद्र विश्वनाथ पोटदुखे, विवेक शरद दिवाण, मुजीब वहीद खानशाहीद अहमद खान जीमल अहमद खान, सलीम जुम्मन शेख, स्वप्निल विष्णू भुजाडे, रेहाना इस्माईल शेख आणि राहुल अनिल मेश्राम, असे १५ आरोपी अद्यापही फरार आहेत.
या रॅकेटने चारचाकी वाहन कर्ज प्राप्त करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. इंडियन ओव्हरसीज बँकेत कर्ज प्रस्ताव सादर करून तो मंजूर केला होता. सेंट्रल प्रोव्हिन्स मोटर्स, थापर सन्स मोटर्स आणि स्टार मोटर्स या नामांकित वाहन वितरक कंपन्यांमधून वाहने खरेदी केल्याचे बनावट इन्व्हाईस तयार करून ते बँकेत सादर केले होते. कर्ज रकमेचे डिमांड ड्राफ्ट आरोपींनी स्वत:च प्राप्त केले होते. विविध बँकांमध्ये या वाहन वितरक कंपन्यांच्या नावे बनावट खाते उघडले होते. या खात्यांमध्ये डीडी जमा करून रकमा आपापल्या खात्यात वळवल्या होत्या. या टोळीने एकूण १६ वाहनांसाठी १ कोटी ७४ लाखांचे कर्ज घेऊन बँकेची मोठी फसवणूक केली.

Web Title: 1.74 crore fraud investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.