नागपुरात महिलेच्या पोटातून काढला १८ किलोचा ट्युमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:14 PM2018-01-05T22:14:42+5:302018-01-05T22:16:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग विभागात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून १८ किलोचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. गेल्या सहा महिन्यापासून ही महिला ट्युमरसह जगत होती.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग विभागात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून १८ किलोचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. गेल्या सहा महिन्यापासून ही महिला ट्युमरसह जगत होती.
आशा प्रभू इवनाते (३५) रा. नरखेड असे त्या महिलेचे नाव आहे.
घरची हालखीची स्थिती. यातच मोठा मुलगा घराबाहेर राहत असल्याने आशा इवनाते या गेल्या सहा महिन्यांपासून पोटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करीत होत्या. तिच्या मोठ्या मुलाला ही बाब लक्षात आल्यावर त्याने मेडिकलच्या स्त्री रोग व प्रसुती विभागात भरती केले. या विभागाचे डॉ. अनिल हुमणे यांनी महिलेची तपासणी केली. २२ डिसेंबर रोजी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेतून १८ किलोचा गर्भाशयाचा गोळा बाहेर काढला. हा ‘लियोमायोसारकोमा’ असल्याची शक्यता आहे. या शस्त्रक्रियेत डॉ. हुमणे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. संगावार, डॉ. बक्षी, पथक प्रमुख डॉ. जहागिरदार आदींचा समावेश होता. या चमूचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व विभाग प्रमुख डॉ. फिदवी यांनी कौतुक केले.