नागपुरात पालेभाज्यांच्या १८ रोपवाटिका तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:31 PM2020-10-12T12:31:20+5:302020-10-12T13:23:35+5:30
vegetable nurseries Nagpur News राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना जिल्ह्यात राबविली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालेभाज्यांच्या उत्पादनाला वाव मिळावा व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १८ प्रकल्पांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शासनाकडून यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
या उद्दिष्टानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये एक रोपवाटिका उभारली जाईल. यातून उत्तम दजार्ची पालेभाजी, कीडरोगमुक्त रोपट्यांचे उत्पादन केले जाईल. शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे हा या योजनेमागील हेतू आहे.
रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग करण्याची संधी प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उत्पादन घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून व नव्या तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर या योजनेतून भर दिला जाणार आहे.