१८ हजाराचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:07+5:302020-12-08T04:09:07+5:30
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई १८,२०० रुपये किमतीच्या १.८२० किलाे गांजासह एकूण ...
बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई १८,२०० रुपये किमतीच्या १.८२० किलाे गांजासह एकूण ३८ हजार ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गांजा वाहतूकदार माेटरसायकल साेडून पळून गेल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत आहे. ही कारवाई रविवारी (दि. ६) करण्यात आली.
व्यंकटराव माेहिते, रा. काेपरा, ता. सेलू, जिल्हा वर्धा असे आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुटीबाेरी परिसरात गस्तीवर हाेते. त्याचवेळी त्यांना व्यंकटराव हा माेटरसायकलने गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे एमआयडीसी परिसरात नाकाबंदी केली. पाेलिसांना पाहताच त्याचे त्याची एमएच-३४/जे-४७८४ क्रमांकाची माेटरसायकल मध्येच वळवून टाकळघाट-कान्हाेलीबारा मार्गाने पळ काढला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करायला सुरुवात करताच त्याने माेटरसायकल व पिशवी राेडलगतच्या झुडपात साेडून पळ काढला. झडतीदरम्यान पाेलिसांना माेटरसायकलवर लटकविलेल्या पिशवीत १.८२० किलाे गांजा आढळून येताच माेटरसायकसह गांजा जप्त केला.
या कारवाईत १८,२०० रुपये किमतीचा गांजा आणि २० हजार रुपयाची माेटरसायकल असा एकूण ३८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. आराेपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी प्रदार्थ अधिनियम १९८५, कलम २० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.