संविधानाच्या संरक्षणासाठी १८५ संघटनांनी काढली रॅली : ईव्हीएमही जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:38 PM2019-03-05T23:38:57+5:302019-03-05T23:39:48+5:30

संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली.

185 organizations rally for protection of the constitution: EVMs burnt | संविधानाच्या संरक्षणासाठी १८५ संघटनांनी काढली रॅली : ईव्हीएमही जाळली

संविधानाच्या संरक्षणासाठी १८५ संघटनांनी काढली रॅली : ईव्हीएमही जाळली

Next
ठळक मुद्देसरकारचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली.
विद्यापीठांमध्ये २०० पॉईंट रोस्टर सिस्टमच्या जागेवर १३ पॉईंट रोस्टर सिस्टम लागू केल्याच्या विरोधात देशातील दलित व आदिवासी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. नागपुरात संविधान बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वात भीम चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ३०० दुचाकी होत्या. विविध रंगांचे झेंडे घेऊन विविध संघटनांचे कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव, १३ पॉईंट रोस्टर बंद करा, १० टक्के सवर्ण आरक्षण रद्द करा, आदिवासींना विस्थापित करू नका, ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, आदी मागण्यांसाठी नारे-निदर्शने करण्यात आली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर प्रा. बी.एस. हस्ते, अ‍ॅड. संदेश भालेकर, विक्की बेलखोडे, धर्मेश सहारे, व डॉ. सुनील पेंदोर यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्र्यांची खोटी आश्वासने, खोटे दावे यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.

Web Title: 185 organizations rally for protection of the constitution: EVMs burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.