१८,६९० नवीन मतदारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:03+5:302020-12-17T04:36:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा मतदार संघनिहाय राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण नोंदणीअंतर्गत ३२ हजार ७८२ मतदारांनी जिल्ह्यातील ...

18,690 new voters registered | १८,६९० नवीन मतदारांची नोंदणी

१८,६९० नवीन मतदारांची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधानसभा मतदार संघनिहाय राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण नोंदणीअंतर्गत ३२ हजार ७८२ मतदारांनी जिल्ह्यातील ४ हजार ४३६ मतदान केंद्रांवर आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये १८ हजार ६९० नवीन मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी आज दिली.

निवडणूक आयोगाने १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींच्या नावनोंदणीसह मतदार यादीमधील विशेष दुरुस्ती तसेच विधानसभा क्षेत्र बदल, स्थलांतरित आदीबाबत मतदारांकडून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत विधानसभा मतदार संघनिहाय ३२,७८२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १८,६९० नवीन मतदारांची नोंदणी, ९,४३० नावे कमी करणे अथवा स्थलांतरित, ३,८७७ मतदार यादीमध्ये असलेल्या नावांमध्ये दुरुस्ती तर ८१२ अर्ज विधानसभा क्षेत्र बदलाबाबत प्राप्त झाले आहेत.

हिंगणा विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ३,८२८ नवीन मतदार नोंदणी झाली आहे. नागपूर (पूर्व) मध्ये ३,२४३, कामठी ३,२१४, रामटेक २,०४४, सावनेर १,५३१, उमरेड १,१४५, काटोल ७५३, नागपूर (दक्षिण) ६०९, नागपूर (मध्य) ६२७, नागपूर (पश्चिम) ६०२, नागपूर (उत्तर) ४०८ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविली आहेत.

जिल्ह्यात १६ डिसेंबर, २०२० च्या मतदार यादीनुसार ४२ लाख ३,८६९ मतदार आहेत. यामध्ये २१ लाख ४९ हजार ५९८ पुरुष, तर २० लाख ५४ हजार १९० स्त्री मतदारांचा समावेश आहे.

Web Title: 18,690 new voters registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.