नागपूर जिल्ह्यात १९ जण कोरोना पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 09:32 PM2021-12-07T21:32:13+5:302021-12-07T21:33:50+5:30
Nagpur News तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे १९ रुग्णांची नोंद झाली. यात शिवाजीनगरातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे.
नागपूर : तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे १९ रुग्णांची नोंद झाली. यात शिवाजीनगरातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्यासंख्येत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. रुग्णांची एकू ण संख्या ४,९३,६८४ झाली असून मृतांची संख्या १०,१२२वर पोहचली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लोटत सर्वाधिक रुग्णांची नोंद एप्रिल महिन्यात झाल्यानंतर मे महिन्यापासून रुग्णसंख्या ओसरायला लागली. २ जुलै रोजी सर्वाधिक ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, ३१ जुलै रोजी २४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १०च्या आत रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी १९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १६ रुग्ण असून ग्रामीणमधील २ तर १ जिल्हाबाहेरील आहे. आज नागपूर जिल्ह्यात २९४१ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.६ टक्के आहे. मागील २५ दिवसांपासून मृत्यूची नोंद नाही. मात्र, कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ८१ झाली आहे. यातील ६२ रुग्ण शहरातील, १६ रुग्ण ग्रामीणमधील तर ३ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत.
- लग्नातून पसरला संसर्ग
महानगरपालिके ने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून ३० जण हेद्राबाद येथे लग्नाला गेले होते. यातील शिवाजीनगरातील ९ जणांचा समावेश होता. याच लग्नातून त्यांना लागण झाली असावी. नागपुरात आल्यावर त्यांनी तपासणी के ल्यावर सर्वच पॉझिटिव्ह आले. या सर्वांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नागपुरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी के ली जात आहे.
-विदेशातून आतापर्यंत आले २६८ प्रवाशी
विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत २६८ प्रवाशांची नोंद झाली आहे. यातील १६० प्रवाशांचा शोध लागला आहे. यातील ८० जणांचे नमुने तपासण्यात आले असून तीन जण पॉझिटिव्ह आले. उर्वरीत १०८ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. यात ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवरील ‘हाय रिस्क’ देशातील प्रवाशी नसल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: २९४१
शहर : १६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
-बाधित रुग्ण :४,९३,६८४
- सक्रिय रुग्ण :८१
- बरे झालेले रुग्ण :४,८३,४८१
- मृत्यू : १०,१२२